kodeforest
Welcome to VETBEA

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण बुध्दिस्ट एम्प्लाईज असोसिएशन (VETBEA) ही महाराष्ट्रातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालया अंतर्गत कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांची सामाजिक बांधीलकी म्हणून काम करणारी असोसिएशन आहे. या असोसिएशन अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांची कार्यक्षमता वाढविणे, सामाजीक एकोपा निर्माण करुन आपसात बंधुभाव रुजविणे, प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांच्या ज्ञानामध्ये भर पाडणे, प्रशिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी सतत कार्यरत राहणे. अशा प्रकारचे व्यापक दृष्टीकोण ठेवून सन २०१२ मध्ये मा. धर्मदाय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे असोसिएशन पंजीकृत करण्यात आलेली आहे. असोसिएशनच्या माध्यमातून आतापर्यंत भारताचे संविधान सर्व सामान्य समाज बांधवांना समजावेत म्हणुन संविधाच्या उद्देशिकेच्या प्रती तयार करुन वितरीत करण्याचे काम करण्यात आलेले आहे. तसेच धम्मचक्र प्रर्वतन दिन कार्यक्रमाचे निमित्ताने भारतीय नागरीकांचे मुलभूत कर्तव्य व अधिकार, Atrocities Act बाबत सविस्तर माहिती, २२ प्रतिज्ञा इत्यादी बाबत माहिती पुस्तिका तयार करुन सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करण्यात आले आहे. तसेच वेगवेगळया कार्यक्रमामधून ते समजावून सांगण्याचे कार्य केले जात आहे.

EDUCATE

Educate. We shall need all our intelligence.

AGITATE

Agitate. We shall need all our enthusiasm.

ORGANISE

Organise. We shall need all our force.”

OBJECTIVES

१) भारतीय संविधानाबाबत जनजागृती करीता प्रचार व प्रसार करणे.

२ ) सर्व सभासद व नागरीकांमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व न्याय ही भावना रुजविण्याकरीता प्रयत्नशिल राहणे.

३) महाराष्ट्र राज्यातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिनस्त बुध्दीस्ट कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या अडचणी सोडविणे, त्यांच्या न्याय हक्कासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे. त्यांच्यात ऐक्यभावना व नैतिकता रुजविणे.

४) गरीब व होतकरु प्रशिक्षणार्थ्यांच्या व विद्यार्थ्यांच्या उन्नतीकरीता सहकार्य करणे.

५) खात्यास शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतीक व वैचारीक उपक्रम राबविणे.

६) आर्थिक दृष्टीने संघटना मजबुत करणे व बुध्दीस्ट कर्मचाऱ्यांच्या उन्नतीसाठी आर्थीक विकासाचे उपक्रम राबविणे.

७) शैक्षणिक व व्यवसायीक सहली आयोजित करणे.

८) सभासदाचे कौटुंबिक, सामाजिक व वैचारीक मेळावे आयोजित करणे.

९) विशेष कार्याबद्दल अधिकारी, कर्मचारी व त्यांची पाल्ये यांचा सत्कार करणे.

१०) प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष होणाऱ्या अन्यायाच्या विरुध्द दाद मागणे व सनदशिर मार्गाने संघर्ष करणे.

११) महिलांच्या उन्नतीसाठी कार्य करणे.

१२) विभागीय स्तरावर सामाजिक भवन निर्माण करणे.

१३) असोसिएशनच्या सभासदाची कार्यक्षमता वाढविण्याकरिता कार्यशाळा आयोजीत करणे.

१४) समविचारी संघटना / संस्था यांचेशी समन्वय करणे.

Our Organisation

  President. Premanand N Bhaisare

  Vice President . Shreeratn K Barde

   Secretary. Santosh P Bhagat

   Joint Secretary Nagsen Sarje

   Treasure . Vijay S Nagrale

    Member. Anand Kale

    Member. Ashok R Tambakhe

    Member. Anand Sontake

   Member.Varsha Meshram

    Member.Ranjana R Dhakne

    Member.Balu Choure

    Member.Shobha Gangurde

Latest Events
OTHER ORGINATION

© 2022 - Vetbea - All Rights Reserved