१) भारतीय संविधानाबाबत जनजागृती करीता प्रचार व प्रसार करणे.
२ ) सर्व सभासद व नागरीकांमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व न्याय ही भावना रुजविण्याकरीता प्रयत्नशिल राहणे.
३) महाराष्ट्र राज्यातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिनस्त बुध्दीस्ट कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या अडचणी सोडविणे, त्यांच्या न्याय हक्कासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे. त्यांच्यात ऐक्यभावना व नैतिकता रुजविणे.
४) गरीब व होतकरु प्रशिक्षणार्थ्यांच्या व विद्यार्थ्यांच्या उन्नतीकरीता सहकार्य करणे.
५) खात्यास शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतीक व वैचारीक उपक्रम राबविणे.
६) आर्थिक दृष्टीने संघटना मजबुत करणे व बुध्दीस्ट कर्मचाऱ्यांच्या उन्नतीसाठी आर्थीक विकासाचे उपक्रम राबविणे.
७) शैक्षणिक व व्यवसायीक सहली आयोजित करणे.
८) सभासदाचे कौटुंबिक, सामाजिक व वैचारीक मेळावे आयोजित करणे.
९) विशेष कार्याबद्दल अधिकारी, कर्मचारी व त्यांची पाल्ये यांचा सत्कार करणे.
१०) प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष होणाऱ्या अन्यायाच्या विरुध्द दाद मागणे व सनदशिर मार्गाने संघर्ष करणे.
११) महिलांच्या उन्नतीसाठी कार्य करणे.
१२) विभागीय स्तरावर सामाजिक भवन निर्माण करणे.
१३) असोसिएशनच्या सभासदाची कार्यक्षमता वाढविण्याकरिता कार्यशाळा आयोजीत करणे.
१४) समविचारी संघटना / संस्था यांचेशी समन्वय करणे.